सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे द्राक्ष बागेत विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सद्यःस्थितीत द्राक्ष बागेत अवेळी पावसामुळे पानांवर आणि मण्यांवर काळ्या रंगाच्या बुरशीची वाढ दिसून येत आहे. बुरशीची ही वाढ पानांच्या वरील आणि मागील बाजूस दिसत आहे. ही बुरशी प्रामुख्याने सफेद आणि रंगीत द्राक्षांच्या जातींवर दिसून येते. या बुरशीला ‘सुटी मोल्ड’ असे म्हणतात. योग्य वेळी व्यवस्थापन न केल्यास, बुरशी सर्व पानांवर आणि द्राक्ष घडांवर पसरते.
सुटी मोल्ड बुरशी वाढण्याची कारणे
- या बुरशीची वाढ मिलिबग आणि मावा किडीचा प्रादुर्भाव असलेल्या बागेत अधिक प्रमाणात दिसून येतो. या वर्षी द्राक्ष बागांमध्ये मिलीबग आणि मावा यांचे प्रमाण कमी असून देखील बुरशीचा प्रादुर्भाव दिसून आला. याचे कारण, बुरशीनाशके, कीटकनाशके किंवा अन्य रासायनिक फवारणीमुळे काही मण्यांच्या पृष्ठभागावर विकृती तयार होते. किंवा काही वेळा बुरशीनाशकांच्या अधिक वापरामुळे मण्यांना तडे जातात. आणि त्याजागी ३ ते ४ बुरशींची एकत्रित वाढ होऊ शकते. यामध्ये क्लॅडोस्पोरियम, हेल्मिथोस्पोरियम, अल्टरनेरिया, कर्व्ह्युलेरिया या मृतोपजीवी (सॅप्रोफायटीक) बुरशींची वाढ होते. या बुरशीची वाढ मृत पेशींवर होते.
- घडांतील १-२ मण्यांवर असणाऱ्या विकृतीवर या बुरशीची वाढ होऊन ती हळूहळू संपूर्ण घडावर पसरते. पानांवर बुरशी वाढल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा येऊन वेलींवर परिणाम होऊ शकतो.
- सध्या द्राक्षमणी गोडी उतरण्याच्या अवस्थेत आहेत. या काळात घडांवर बुरशीच्या झालेल्या वाढीमुळे मण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.
- क्लॅडोस्पोरियम या बुरशीची वाढ शक्यतो द्राक्ष बागेत दिसत नाही. साधारणतः मण्यांतील गोडी जास्त असल्याने, पनेटमध्ये पॅकिंग केल्यानंतर क्लॅडोस्पोरियम बुरशीचा संसर्ग दिसून येतो. परंतु या वर्षी सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे द्राक्षबागेत या बुरशीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात झालेला दिसत आहे. द्राक्षमणी गोडी उतरण्याच्या अवस्थेत असताना या बुरशीचा प्रादुर्भाव अधिक नुकसानकारक ठरू शकतो. ही काळी बुरशी बोट्रिटिस सारखी दिसते.
- आतापर्यंत क्लॅडोस्पोरियमचे प्रमाण जास्त नसल्यामुळे बागेतील घडांवर त्याचा प्रादुर्भाव दिसून आला नाही. बुरशीची वाढ झालेल्या मण्यांना सूक्ष्म दर्शिकेखाली बघितल्यास क्लॅडोस्पोरियमचा संसर्ग दिसून येतो. ही बुरशी जास्त हानिकारक नाहीये. त्यामुळे मण्यांच्या आत जाऊन मण्यांची सड कूज करण्याची शक्यता नाही.
- कमी-अधिक प्रमाणात अवेळी पडलेला पाऊस या बुरशीचे बीजाणूंच्या प्रसाराचे कारण असू शकते. त्यामुळे या बुरशीचा प्रादुर्भाव अधिक दिसतो.
- या बुरशीच्या नियंत्रणासाठी द्राक्षबागांच्या या अवस्थेत कोणत्याही रासायनिक व जैविक बुरशीनाशकांचा वापर करू नये. त्याऐवजी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने सिलिकॉनयुक्त सरफेक्टनंट ०.३ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे घेऊन संसर्गित घड धुऊन काढावेत.
- डॉ. सुजोय साहा, ७०६६२४०९४६
(राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)

0 comments:
Post a Comment