सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कांद्याच्या आवकेत विक्रमी वाढ झाली. पण मागणीत सातत्य असल्याने दर मात्र टिकून राहिले. कांद्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ३१०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रेनिमित्त सलग तीन दिवस कांदा बाजाराला सुटी राहिली. पण आठवड्याच्या सुरवातीचे दोन दिवस आणि शेवटचा एक दिवस या तीन दिवसात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. सोमवारी (ता.१०) बाजार समितीत तब्बल १ लाख ५४ हजार १ क्विंटल इतकी कांद्याची विक्रमी आवक झाली. आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वाधिक आवक सांगितली जाते.
स्थानिक भागासह पुणे, नगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, सांगली जिल्ह्यातून कांद्याची आवक झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी १६०० रुपये आणि सर्वाधिक ३१०० रुपये दर मिळाला. त्यानंतर १२ ते १४ जानेवारी सलग तीन दिवस कांदा बाजाराला सुटी राहिली. शनिवारी (ता.१५) पुन्हा लिलाव सुरु झाले, तेव्हाही ५० हजार क्विंटल आवक झाली. पण प्रतिक्विंटलमागे किरकोळ १०० ते २०० रुपयांच्या फरकाने दर स्थिर राहिले. या दिवशीही कांद्याला किमान १०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला.
हिरवी मिरची, वांगी, गवार, भेंडीला पुन्हा एकदा चांगला उठाव मिळाला. त्यांचेही दर स्थिर राहिले. त्यांची आवक मात्र प्रत्येकी ३० ते ५० क्विंटलपर्यंत राहिली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १९०० रुपये, सरासरी २२०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये, तर वांग्यांना प्रतिक्विंटलला किमान १२०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ६००० रुपये, गवारीला किमान २००० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ६००० रुपये, तर भेंडीला किमान १५०० रुपये, सरासरी ४००० रुपये आणि सर्वाधिक ५००० रुपये असा दर मिळाला.
द्राक्ष, पेरूला उठाव
या सप्ताहात द्राक्ष आणि पेरूला चांगला उठाव मिळाला. त्यांची आवकही चांगली राहिली. द्राक्षाची प्रतिदिन एक ते दोन गाड्या, पेरूची २० ते ४० क्विंटल अशी आवक राहिली. त्यांची आवक सर्वाधिक स्थानिक भागातूनच राहिली. द्राक्षाला चार किलोच्या पेटीला किमान १०० रुपये, सरासरी ११० रुपये आणि सर्वाधिक १६० रुपये आणि पेरूला प्रतिक्विंटलला किमान ११०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपये असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

0 comments:
Post a Comment