नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याच्या आवकेत काहीशी घट झाली. मात्र वांगी, शेवगा, गवारसह अन्य भाजीपाल्याचे दर टिकून होते. भुसारच्या आवकेतही मागील आठवड्यात आवक वाढली आहे.
नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत पंधरा दिवसांपूर्वी दर दिवसाला १ हजार १४०० क्विंटलपर्यंत भाजीपाल्याची आवक होत होती. त्यात तुलनेत गेल्या आठवडाभरात दररोज ५०० ते ८०० क्विंटलची आवक झाली. मागील आठवड्यात टोमॅटोची रोज १०५ क्विंटलची आवक झाली. दर ५०० ते १३०० रुपयांचा मिळाला.
वांग्यांची १० ते १५ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ७ हजार, फ्लॉवरची ३६ ते ४० क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार ५००, शिमला मिरचीची १२ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ५ हजार, शेवग्याची ५ ते ७ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ७ हजार, हिरव्या मिरचीची ३४ ते ४० क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार ४००, बटाट्याची १२७ ते १३५ क्विंटलची आवक होऊन ८०० ते १३००, भेंडीची १५ ते २० क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजार रुपये दर मिळाला.
दोडक्याची ७ ते १० क्विंटलची आवक होऊन ३ हजार ते ४ हजार ५००, घोसाळ्याची ३ ते ५ क्विंटल आवक, तर १ हजार ते २ हजार ५००, काकडीची २७ ते ३० क्विंटलची आवक होऊन ८०० ते १२००, वाटाण्याची ९८ ते ११० क्विंटलची आवक होऊन १५०० ते ३००० रुपयाचा प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. पालेभाज्यात कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू, करडी भाजीला चांगली मागणी राहिली.
हरभऱ्याला ३८०० ते ४५०० रुपये
बाजार समितीत गेल्या आठवड्यात भुसारची आवक वाढली. दर दिवसाला १२०० क्विंटलच्या पुढे आवक होत आहे. ज्वारीला १७०० ते १९००, बाजरीला १५०० ते २०००, तुरीला ४ हजार ते ६ हजार, हरभऱ्याला ३८०० ते ४५००, मुगाला ५२०० ते ६६००, उडदाला ४५०० ते ६ हजार, मठाला ९ हजार, लाल मिरचीला २२ हजार ३०० गव्हाला १८०० ते २ हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

0 comments:
Post a Comment