Monday, January 24, 2022

कळमणात तूर हमीदराखाली

नागपूर ः तुरीच्या दरात गेल्या आठवड्यात चांगली तेजी आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान होते. ही तेजी कायम राहील, अशी अपेक्षा असतानाच तुरीत ओलावा अधिक असल्याच्या कारणामुळे या आठवड्यात कळमणा बाजार समितीमधील व्यवहारात तुरीच्या दरात घसरण झाली. सद्या तुरीचे दर हमीभावाच्या खाली आले आहेत. तरीही या वर्षी उत्पादकता कमी असल्याने त्यात पुन्हा तेजी येईल, असे संकेत व्यापाऱ्यांनी दिले.

गेल्यावर्षी तुरीला ६०० रुपयांचा हमीभाव होता. यावर्षी त्यात ३०० रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यानुसार तुरीचे हमीभाव ६३०० रुपये आहेत. कळमणा बाजार समितीत जानेवारी महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात तुरीचे दर ६०७१ ते ६२१६ रुपये होते. त्यानंतर टप्याटप्प्याने त्यात वाढ झाली. मंगळवारी (ता.११) तुरीला ६०५० ते ६८०० रुपयांचा दर मिळाला. या आठवड्यात तुरीला ६००२ ते ६२२८  दर होता. आवक १६१ क्‍विंटल झाली. 

ज्वारीची अवघी तीन क्‍विंटल आवक होत २२०० ते २५०० रुपये दर राहिला. या आठवड्यात १९३२ ते २१८० रुपयांनी गव्हाचे व्यवहार झाले. गव्हाची आवक ५०० क्‍विंटल आहे. तांदूळ २७०० ते ३००० रुपये क्‍विंटल असून आवक १३७ क्‍विंटलची होती. हरभरा दरात अल्पशी सुधारणा नोंदविली गेली. ४३५० ते ४४११ असा दर हरभऱ्याला गेल्या आठवड्यात मिळाला. या आठवड्यात हे दर ४१०० ते ४६५० रुपयांवर पोचले.

हरभऱ्याची आवक जेमतेम २७ क्‍विंटलची होती. मुगाच्या दरात तेजी आहे. ६४०० ते ६६०० प्रतिक्‍विंटलने व्यवहार होत आहेत. मुगाची आवक देखील ३० क्‍विंटल पर्यंत मर्यादित आहे. 

जवसाचे व्यवहार ५१०० ते ५३०० रुपयांनी होत आहेत. तिळाची बाजारातील आवक दोन क्‍विंटलची, तर दर ७८०० ते ८००० रुपये होते. भुईमूग शेंगाचे दर ४००० ते ४५०० रुपये आणि आवक १५ क्‍विंटल इतकी राहिली. संत्र्याला २५०० ते ३००० रुपये क्‍विंटलचा दर मिळाला तर आवक १००० क्‍विंटलची आहे. मोसंबीची आवक देखील १ हजार क्‍विंटल, तर दर २६०० ते २८०० रुपये मिळाला. 
 
News Item ID: 
820-news_story-1643025083-awsecm-244
Mobile Device Headline: 
कळमणात तूर हमीदराखाली
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
Agriculture news in marathi, Tur Under hamidar in Kalaman
टीम अॅग्रोवन
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
नागपूर, Nagpur, ओला, बाजार समिती, agriculture Market Committee, हमीभाव, Minimum Support Price, ज्वारी, Jowar, भुईमूग, Groundnut, मोसंबी, Sweet lime
Twitter Publish: 
Meta Keyword: 
Tur Under hamidar in Kalaman
Meta Description: 
Tur Under hamidar in Kalaman नागपूर ः तुरीच्या दरात गेल्या आठवड्यात चांगली तेजी आल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान होते. ही तेजी कायम राहील, अशी अपेक्षा असतानाच तुरीत ओलावा अधिक असल्याच्या कारणामुळे या आठवड्यात कळमणा बाजार समितीमधील व्यवहारात तुरीच्या दरात घसरण झाली.

0 comments:

Post a Comment