लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इतर भाजीपाल्याच्या तुलनेत कोबी, फ्लॉवर, टोमॅटो व गाजराचीच आवक शुक्रवारी (ता.२८) बरी राहिली. त्यातही फ्लॉवरचीच आवक सर्वाधिक राहिली.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी वांग्यांची ३ क्विंटल आवक झाली. त्यांना सरासरी १००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. २ क्विंटल आवक झालेल्या दोडक्याचे दर सरासरी ४००० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २ क्विंटल आवक झालेल्या भेंडीला सरासरी ४००० रुपये दर मिळाला. कोबीची आवक १३ क्विंटल, तर सरासरी दर १५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. २० क्विंटल आवक झालेल्या फ्लॉवरला सरासरी १२०० रुपये दर मिळाला. गावरान टोमॅटोची आवक १४ क्विंटल, तर सरासरी दर १२०० रुपये राहिले. १२ क्विंटल आवक झालेल्या वैशाली टोमॅटोलाही सरासरी १२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
पालकाची आवक १ क्विंटल, तर सरासरी दर ६०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. शेपूला सरासरी १२०० रुपये दर मिळाला. गाजराची आवक ११ क्विंटल, तर सरासरी दर ७०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. १ क्विंटल आवक झालेल्या दुधी भोपळ्याला सरासरी १००० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची आवक ८ क्विंटल, तर सरासरी दर ११०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. हिरव्या मिरचीचे सरासरी ४५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले. ४ क्विंटल आवक झालेल्या वैशाली मिरचीला सरासरी ४००० रुपये दर मिळाला. वाटाण्याचे सरासरी दर ३००० रुपये प्रतिक्विंटल राहिले.
मेथीची १५०० जुड्यांची आवक होऊन सरासरी ३०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. ५०० जुड्यांची आवक झालेल्या कांदापेंडीला सरासरी ४०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. लिंबूची आवक ३ क्विंटल, तर सरासरी दर २२०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. काकडीला सरासरी १००० रुपये दर मिळाला. कारल्याचे सरासरी दर २५०० रुपये प्रतिक्विंटल राहिले.

0 comments:
Post a Comment