Thursday, August 9, 2018

सोयाबीन, खरीप मका, कापसाच्या भावात घट

या सप्ताहात रब्बी मका वगळता इतर सर्व पिकांच्या किमतीत घट झाली. सर्वांत अधिक घट गवार बी मध्ये (२ टक्के) होती. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन, खरीप मका व कापूस वगळता इतरांचे भाव वाढतील.

या सप्ताहात माॅन्सूनने फारशी समाधानकारक प्रगती केली नाही. त्यामुळे १ जूनपासून ७ ऑगस्टपर्यंत झालेला पाऊस सरासरीपेक्षा १० टक्क्यांनी कमी आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस मुख्यत्वे आसाम, झारखंड, सौराष्ट्र व रायलसीमा येथे झालेला आहे. पुढील सप्ताहात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. पुढील वर्षी मागणी वाढेल, असा अंदाज आहे. आयात कमी करणे व निर्यातीला उत्तेजन देणे हे शासनाचे प्रमुख धोरण राहील. बाजारभाव हमी भावापेक्षा अधिक राहावेत, यासाठी शासन प्रयत्नशील राहील. सोयाबीन पेंडीच्या निर्यातीवरील सवलत वाढवलेली आहे. हळदीच्या चीन व बांगलादेशमधील निर्यातीत सुद्धा वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. कापसाच्या अमेरिकेतील उत्पादनामध्ये अपेक्षेपेक्षा अधिक घट होण्याची शक्यता आहे. ६ ऑगस्टपासून हरभ-याचे जानेवारी २०१९ डिलिव्हरीसाठी व्यवहार सुरू झाले. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका
रब्बी मक्याच्या (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या (रु. १,२०८ ते रु. १,३०३). या सप्ताहात त्या ०.६ टक्क्यांनी वाढून रु. १,३११ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,२३० वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,३७१ वर आहेत. मागणी वाढती आहे. खरीप मका (सांगली) चा नोव्हेंबर २०१८ डिलिव्हरी भाव १,३३१ आहे. नवीन हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). अजून या डिलिव्हरीसाठी फारसे व्यवहार होत नाहीत.

साखर
साखरेच्या (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या (रु. ३,३७५ ते रु. ३,१८४). या सप्ताहात त्या रु. ३,१८८ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१८० वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. मार्च (२०१९) च्या फ्युचर्स किमती रु. ३,१८८ वर आल्या आहेत. साखरेत फारसे व्यवहार होत नाहीत.

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जुलै महिन्यात १६ तारखेपर्यंत पर्यंत घसरत होत्या (रु. ३,५४३ ते रु. ३,३०७). नंतर त्या रु. ३,३३७ ते रु. ३,४२९ दरम्यान राहिल्या. या सप्ताहात त्या रु. ३,३९३ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,५५० वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८, जानेवारी २०१९ व फेब्रुवारी २०१९ च्या किमती अनुक्रमे रु. ३,४२५, रु. ३,४६५ व रु. ३,५०५ आहेत. भारताचे या वर्षीचे उत्पादन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). ऑक्टोबरनंतर सोयाबीन हमी भावापेक्षा अधिक राहण्याची अपेक्षा आहे.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (सप्टेंबर) घसा जुलै महिन्यातील किमती १२ तारखेपर्यंत घसरत होत्या (रु. ७,२५० ते रु. ६,९६६). नंतर त्या वाढून रु. ७,४०० पर्यंत गेल्या. या सप्ताहात त्या रु. ७,२८२ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,३३० वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,४६६). आता आवक कमी होऊ लागली आहे. स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. मात्र, पाऊस चांगला होत असल्याने उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे.

गहू
गव्हाच्या (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या (रु. १,८६२ ते रु. १,९९८). या सप्ताहात त्या रु. १,९८५ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,९६२ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा २.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,०१५). पुढील दिवसांत वाढ अपेक्षित आहे.

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या. (रु. ४,०५५ ते रु. ४,४५२). या सप्ताहात त्या रु. ४,३६४ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती १.७ टक्क्यांनी घसरून रु. ४,२८० वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती ३.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४४०).

हरभरा
हरभ-याच्या फ्युचर्स (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात १२ तारखेपर्यंत वाढत होत्या (रु. ३,६२८ ते रु. ४,४०८). नंतर त्या रु. ४,०९२ रु. ४,२९२ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या १.४ टक्क्यांनी घसरून रु. ४,१९३ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,१८२ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा २.५ टक्क्यांनी अधिक आहेत. (रु. ४,२८७). आयातीवरील वाढत्या नियंत्रणामुळे व वाढत्या मागणीमुळे हरभ-यात वाढ अपेक्षित आहे.

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या (रु. २२,८१० ते रु. २४,१२०). या सप्ताहात त्या २३,९९० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २३,४५२ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. २३,३८० आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी अजून तरी कापसाखाली लागवड कमी आहे. त्यामुळे किमतींत वाढीचा कल राहील. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रती १४० किलोची गाठी).
 
arun.cqr@gmail.com

News Item ID: 
18-news_story-1533817085
Mobile Device Headline: 
सोयाबीन, खरीप मका, कापसाच्या भावात घट
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

English Headline: 
agriculture story in marathi, forward market for agriculture commodities
Author Type: 
External Author
डॉ. अरुण कुलकर्णी

0 comments:

Post a Comment