Saturday, November 10, 2018

बॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल प्रत्यक्षात

सध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत. मात्र, त्यांचा स्मार्टपणा वाढत असताना त्याला ऊर्जा पुरविणाऱ्या बॅटरीची मर्यादा तुलनेने कमी पडत आहे. यावर मात करण्यासाठी बॅटरी किंवा चार्जिंगची आवश्यकता नसलेल्या उपकरणांच्या निर्मितीवर वॉटर्लू विद्यापीठातील संशोधकांनी लक्ष केंद्रित केले आहे.

बॅटरीविरहीत उपकरणामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी आयपी अॅड्रेस असणार आहे. त्यामुळे ही उपकरणे ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ म्हणून ओळखली जातील. इंटरनेटद्वारे चालवली जाणारी किंवा नोंदी घेणाऱ्या या उपकरणामध्ये सध्या बॅटरी घालावी लागत असल्याने त्याचा किंमत आणि देखभाल खर्च वाढत जातो. भविष्यात बॅटरीविरहीत उपकरणांसाठी देखभाल खर्च अत्यंत कमी करणे शक्य होणार आहे. अशा बॅटरी विरहित उपकरणांच्या निर्मितीसाठी वॉटर्लू येथील चेरीटन स्कूल फॉर कॉम्प्युटर सायन्य येथील प्रो. ओमिद अबारी, पोस्ट डॉक्टरल संशोधक जू वांग आणि प्रो. श्रीनिवासन केशव यांनी संशोधन केले आहे. त्यांनी विविध उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रेडिओ फ्रेक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन टॅग (आरएफआयडी) वर काम केले. त्यात सूक्ष्म अॅण्टेना आणि सेन्सिंग उपकरण बसवण्यात आला. त्यात प्रकाशाला संवेदनशील असे सेन्सर बसवले. त्यामुळे या छोट्या उपकरणासाठी आवश्यक तेवढी ऊर्जा तयार केली जाते. भविष्यात बॅटरीरहित उपकरणांसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त राहू शकेल, असा विश्वास संशोधक व्यक्त करत आहेत.

News Item ID: 
18-news_story-1541767436
Mobile Device Headline: 
बॅटरीरहित उपकरणांचे स्वप्न येईल प्रत्यक्षात
Appearance Status Tags: 
Section News
Mobile Body: 

सध्या विविध स्मार्ट उपकरणे बाजारात येत आहेत. मात्र, त्यांचा स्मार्टपणा वाढत असताना त्याला ऊर्जा पुरविणाऱ्या बॅटरीची मर्यादा तुलनेने कमी पडत आहे. यावर मात करण्यासाठी बॅटरी किंवा चार्जिंगची आवश्यकता नसलेल्या उपकरणांच्या निर्मितीवर वॉटर्लू विद्यापीठातील संशोधकांनी लक्ष केंद्रित केले आहे.

बॅटरीविरहीत उपकरणामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी आयपी अॅड्रेस असणार आहे. त्यामुळे ही उपकरणे ‘इंटरनेट ऑफ थिंग्स’ म्हणून ओळखली जातील. इंटरनेटद्वारे चालवली जाणारी किंवा नोंदी घेणाऱ्या या उपकरणामध्ये सध्या बॅटरी घालावी लागत असल्याने त्याचा किंमत आणि देखभाल खर्च वाढत जातो. भविष्यात बॅटरीविरहीत उपकरणांसाठी देखभाल खर्च अत्यंत कमी करणे शक्य होणार आहे. अशा बॅटरी विरहित उपकरणांच्या निर्मितीसाठी वॉटर्लू येथील चेरीटन स्कूल फॉर कॉम्प्युटर सायन्य येथील प्रो. ओमिद अबारी, पोस्ट डॉक्टरल संशोधक जू वांग आणि प्रो. श्रीनिवासन केशव यांनी संशोधन केले आहे. त्यांनी विविध उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रेडिओ फ्रेक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन टॅग (आरएफआयडी) वर काम केले. त्यात सूक्ष्म अॅण्टेना आणि सेन्सिंग उपकरण बसवण्यात आला. त्यात प्रकाशाला संवेदनशील असे सेन्सर बसवले. त्यामुळे या छोट्या उपकरणासाठी आवश्यक तेवढी ऊर्जा तयार केली जाते. भविष्यात बॅटरीरहित उपकरणांसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त राहू शकेल, असा विश्वास संशोधक व्यक्त करत आहेत.

English Headline: 
agricultural stories in Marathi, agrowon, agrovision, Batteryless smart devices closer to reality
वृत्तसेवा
Author Type: 
Agency
Search Functional Tags: 
मात, mate, शिक्षण, संशोधन अहवाल
Twitter Publish: 

0 comments:

Post a Comment