जेठा गड्डा, बगल गड्डा, आणि हळकुंडे लागवडीसाठी बेणे म्हणून वापरता येते. निवडलेले बेणे त्वरित झाडाखाली सावली असलेल्या थंड ठिकाणी ढीग करून साठवावेत. बेण्याचा ढीग करताना हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी, अन्यथा उगवणीवर परिणाम होऊ शकतो.
सध्या हळद काढणीचा हंगाम सुरू आहे. हळद काढणी झाल्यांतर २ ते ३ दिवसांनी हळदीच्या कंदाची मोडणी करावी. हळद कंदाचा गडडा हळूच आपटला असता गड्याला चिकटलेली माती वेगळी होण्यास मदत होते. त्या वेळी जेठ्ठा गड्डा (मातृगड्डा), बगल गड्डा, सोरा गड्डा, हळकुंडे आणि याव्यतिरिक्त रोगग्रस्त हळकुंडे अशाप्रकारे कच्च्या मालाची प्रतवारी करावी. त्यानुसार त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी. यापैकी जेठा गड्डा, बगल गड्डा, आणि हळकुंडे लागवडीसाठी बेणे म्हणून वापरली जातात. बेणे निवडताना योग्य काळजी घेणे गरजेचे असते.
जेठा गड्डा :
१) मुख्य रोपाच्या खाली वाढणाऱ्या कंदास जेठा गड्डा किंवा मातृगड्डा असे म्हणतात. प्रामुख्याने पुढील वर्षी लागवडीसाठी बेणे म्हणून मातृकंदाचेच गड्डे ठेवावेत.
२) हळद कंदापासून मातृकंद वेगळे करावेत. सशक्त, निरोगी, मातृकंद गड्डे बेणे म्हणून निवडून काढावे. बेण्यासाठी निवडलेल्या मातृकंदाचे वजन ५० ग्रॅम पेक्षा जास्त असावे. आकार त्रिकोणाकृती असावा.
बगल गड्डे :
१) जेठा गड्ड्याला आलेल्या फुटव्यांच्या खाली येणाऱ्या गड्ड्याला बगल गड्डे असे संबोधतात. त्यास अंगठा गड्डे असेही संबोधतात.
२) या बगल गड्ड्यांचे वजन ४० ग्रॅमपेक्षा अधिक असते. हे बगल गड्डे लागवडीसाठी बेणे म्हणून वापरले जाते.
सोरा गड्डा :
१) लागवडीच्या वेळीस वापरलेले जेठा गड्डे पिकाच्या नऊ महिने वाढीच्या कालावधीत ५० ते ६० टक्के कुजून जातात. राहिलेल्या ४० ते ५० टक्के कंदांना सोरा गड्डे असे म्हणतात.
२) सोरा गड्डे हे दिसायला काळपट रंगाचे तसेच मुळ्याविरहित असतात. बेणे म्हणून सोरा गड्डे वापरता येत नाहीत.
हळकुंडे :
१) बगल गड्ड्याला आलेल्या कंदास हळकुंडे असे म्हणतात.
२) हळकुंडेदेखील बेण्यासाठी वापरली जातात. बेण्यासाठी निवडलेल्या हळकुंडाचे वजन ३० ग्रॅमपेक्षा जास्त असावे.
३) मातृकंद कमी पडत असतील तर हळकुंडे बेणे म्हणून वापरावे. निवडलेली हळकुंडे ठळक, लांब, जाड, ठसठशीत वाढलेली, निरोगी आणि एकसमान आकाराची भेसळमुक्त असावीत.
बेण्याची साठवणूक ः
१) निवडलेले बेणे त्वरित झाडाखाली सावली असलेल्या थंड ठिकाणी ढीग करून साठवावे.
२) बेण्याचा ढीग करताना हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी, अन्यथा उगवणीवर परिणाम होऊ शकतो.
३) बेणे थोडासा उंचवटा करून कोन पद्धतीने ढीग करून रचावे. ढिगावर हळदच्या वाळलेल्या पाल्याचा १० ते १५ सें.मी. थर द्यावा. ज्याठिकाणी तापमान जास्त असते, अशा ठिकाणी पाल्यावर गोणपाट टाकावे. केवळ गोणपाट भिजेल एवढेच पाणी गोणपाटावर फवारावे.
४) साधारणत: दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीपर्यंत बियाणे सुप्तावस्थेत जाते. या कालावधीत केवळ अंतर्गत बदल घडून येत असतात. कोणत्याही स्वरूपात बाह्य बदल दिसून येत नाहीत.
५) सुप्तावस्था संपेपर्यंत बेण्यावर पाणी शिंपडू नये. दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीत सर्व बेण्यांची सुप्तावस्था पूर्ण होते.
६) सुप्तावस्था संपल्यानंतर बेण्यामध्ये बदल दिसून यायला सुरवात होते. या वेळी बेण्यांवरील डोळे फुगीर होतात, डोळे फुटण्यास प्रारंभ होतो. त्यांतर मात्र बेणे परत निवडावेत. बेण्यावरील मुळ्या काढाव्यात. मुळ्याविरहित, रसरशीत बेणे लागवडीसाठी वापरावेत.
७) बेणे लागवड करण्यास थोडाफार अवधी असेल तर दिवसातून दोन वेळेस बेण्यावर पाणी शिंपडावे. पाणी शिंपडल्यामुळे बेण्याची एकसारखी उगवण होण्यास मदत होते. उष्ण सूर्यप्रकाश, वारा यांचा बेण्याशी प्रत्यक्ष संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी.
डॉ. मनोज माळी ः ९४०३७७३६१४
(हळद संशोधन योजना, कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली)

0 comments:
Post a Comment