जळगाव ः जिल्ह्यात केळीच्या दरात सुधारणा सुरू असून, दर्जेदार नवती केळीचे दर १४०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. परंतु गिरणा, तापी नदीकाठच्या अनेक भागांत काळ्या कसदार, गाळाच्या जमिनींच्या भागात सततच्या पावसाने रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. यामुळे कमी दर्जाच्या केळीची काढणी रखडली आहे.
कमी दर्जाच्या केळीचे नुकसान होईल, या भीतीने अनेक शेतकरी मजुरांच्या माध्यमातून केळीची वाहतूक करून घेत आहेत. ट्रॅक्टरद्वारे केळी जळगाव व इतर बाजार समित्यांमध्ये आणत आहे. या केळीला प्रतिक्विंटल ४०० रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पिलखेडा (ता. जळगाव) येथील एका शेतकऱ्याने काढणी रखडल्याने नुकसानीच्या भीताने जळगाव बाजार समितीत आपली सुमारे १४ क्विंटल केळी ट्रॅक्टरद्वारे आणली. या केळीला अल्प दर मिळाला. एकूण सात हजार रुपये मिळाले. त्यात वाहतूक व मजुरीसंबंधी तीन हजार रुपये खर्च आला. अशीच स्थिती चोपडा व इतर भागांतही असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दर्जेदार केळी सध्या चोपडामधील गोरगावले, विटनेर, माचला, खेडीभोकरी, वढोदा, मोहिदे आदी भागांत आहे. तर जळगावमधील तापीकाठावरील अनेक गावांमध्येदेखील चांगल्या दर्जाची केळी आहे. दरात सुधारणा होत असतानाच खरेदी दारांची लॉबी शेतकऱ्यांची कोंडी करीत आहेत, असा दावा शेतकरी करीत आहेत.
केळीची आवक कमी झाल्याने नवती केळीच्या दरात सुधारणा झाली आहे. मागील पंधरवड्यात दर १३८० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते. सध्या आवक चोपडा, जळगाव, पाचोरा या भागांत सुरू आहे. रावेर, यावलमधील आवक कमी झाली आहे. रावेरात पिलबाग केळीची आवक सध्या सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात मिळून सध्या २५० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) केळीची आवक सुरू आहे. ही आवक पुढील १०-१२ दिवस फारशी वाढणार नाही, असे सांगण्यात आले. दर्जेदार केळीची पाठवणूक उत्तरेकडील राज्यांमध्ये होत आहे. तर कमी दर्जाची केळी स्थानिक बाजारासह नागपूर, छत्तीसगड, कल्याण, ठाणे, पुणे या भागांत पाठविली जात असल्याची माहिती मिळाली.

0 comments:
Post a Comment